Showing posts with label Marathi Kavita. Show all posts
Showing posts with label Marathi Kavita. Show all posts

Friday 24 June 2016

"पहिला पाऊस"

थेंब आशेचा दिलास्याचा
थेंब पहिल्या पावसाचा
हसती फुलं डोलत्या फांद्या
संगीत भिजल्या पानांचा

आनंदाश्रू नयनी तयाच्या
आभार मानतो शेतकरी
पांग फेडले जन्माचे जणू
हरिनाम जापती वारकरी

धावतो चिखल उडवत
भिजल्या अंगाने लेकरू
खुट्या बांधली माय म्हणे
कार्ट्याचे तरी काय करू.

पुन्हा मी माझा..

Wednesday 8 June 2016

तू सोबत असताना..

तू सोबत असताना,
आयुष्य किती छान वाटतं..

उनाड मोकळं,
एक रान वाटतं..

सदैव मनात जपलेलं,
पिंपळपान वाटतं..

कधी बेधुंद,
कधी बेभान वाटतं..

खरंच
तू सोबत असताना,
आयुष्य किती छान वाटतं..

मनात मी कुठेतरी..

नजरेला नजर भिडली असताना
अचानक तुझी नजर का झुकावी

           संवादाद मग्न असताना
           शब्दांनी तुझी साथ का सोडावी

आत्ताच का त्या बेभान वाऱ्याला कळ यावी
की त्याने ती केसांची लट,
तुझ्या चेहऱ्यावर अलगद लहरावी


तू  "इश्श्य" म्हणून,
        या क्षणाला स्त्री वरचा दागिना बनवावं
टाचणीच्या टोका एवढा त्या क्षणाला
        मनात मी कुठेतरी दाटून ठेवावं..

Tuesday 24 May 2016

पुन्हा मी माझा..

मी कमी बोलतो म्हणून
शब्द कागदावर उतरतात
बोलायला गेलो तर वेडे
ओठातूनच परततात

तुला डोळे भरून पाहायचं असतं पण
तू आलीस की डोळेच भरून येतात
आणि बोलायचं म्हटलं तर
शब्द मुकेपण धरून येतात..

Saturday 7 May 2016

बंध जुळले असता..

बंध जुळले असता
मनाचं नातंही जुळायला हवं

अगदी स्पर्शातूनही,
सारं सारं कळायला हवं..

वेडया मनाला माझ्या..

वेडया मनाला माझ्या,
तुझ्याशिवाय आता काही सुचतच नाही

तू, तू अन फक्त तूच
तुझ्याशिवाय दुसरं काही दिसतंच नाही

अबोल हि प्रीत माझी
तुला का कधीच कळत नाही

अन वेडं हे मन माझं
तुला पाहिल्याशिवाय काही राहवतच नाही

तुला पाहिल्याशिवाय
खरंच काही राहवतच नाही.!

Friday 6 May 2016

हरवलेले हे दिवस येतील का पुन्हा,
जगलो आज आणि उद्या हाच दिवस जुना,
नशिबानेच एकदा पुन्हा कुठेतरी भेटू
आठवणीला एकदा एकत्र मिळून वेचू

पण तेव्हा सर्व काही बदललेलं असेल
कोणीतरी बोलावतंय म्हणून भेट लवकर सुटेल

लांबपर्यंत चालणार्या गप्पागोष्टी राहणार नाही,
आठवणींचा हा झरा मग त्या दिशेने वाहणार नाही

आज सोबत आहोत, वाटेल तसं जगून घ्या
जीवनभर पुरतील अशा आठवणी जपून घ्या..

Wednesday 4 May 2016

पहिलं वाहिलं प्रेम असतं..

आयुष्यात न विसरणारी गोष्ट म्हणजे
पहिलं वाहिलं प्रेम असतं
हिवाळ्यातल्या गवतावर चमकणारं
मोत्यासारख दव असतं
आपल्या पहिल्या प्रेमाला
कशाचीच उपमा देता येत नाही
जरी आपण दुसरे प्रेम केले
तरी त्याला पहिल्या प्रेमाची सर कधी येत नाही
दोघांचंही पाहिलं प्रेम आहे
असं एखादंच उदाहरण बघायला मिळतं
नाही तर हल्ली दोघातल एक
दुसरीकडून भरकटून आलेलं असतं
काही झाले तरी पहिल्या प्रेमाची मजाच असते एक वेगळी
आयुष्यभर पुरेल एवढी असते ती शिदोरी..

Tuesday 3 May 2016

त्या क्षणी..

ज्या वेळी तूअलगद,
तू माझा हात धरलास

खरच संग त्या क्षणी
तू स्वत: जवळ कितीसा उरलास..

प्रेमाचा गोडवा..

हळू हळू हवेतला गारवा
वाहतोय नव्या जोमाने
अन त्याच्या प्रेमाचा गोडवा सुद्धा
बहरतोय पुन्हा नव्याने..

भास..

कधी मिळते दु:ख
कधी सुखांची रास रे
तू नेहमीच जवळ असल्याचा
नुकताच भास रे..

तू नसताना....

तू नसताना....
तुझ्यासोबत बोलणे
कल्पनेच्या आरश्यात तुलाच बघणे
आठवांच्या झुल्यात झुलणे
कधी शादाविन बोलणे
असं झालंय तू नसताना..

Monday 2 May 2016

कळतात मला आता..

कळतात मला आता
तुझे सारे बहाणे

घाबरून तुझे हळूच
मिठीत माझ्या येणे..

ओढ म्हणजे काय ते..

ओढ म्हणजे काय ते
जीव लावल्याशिवाय समजत नाही

विरह म्हणजे काय ते
प्रेमात पडल्याशिवाय समाजत नाही

प्रेम म्हणजे काय ते
स्वत: केल्याशिवाय समजत नाही.

माझा मी उरत नाही..

जगाचं भान राहत नाही आता,
तुझ्या विचारात गुंतताना

माझा मी उरत नाही,
तुझ्या आठवणींत हरवून जाताना...

कधी हात हातात..

कधी हात हातात
कधी हात पाठीवर
स्पर्शाने तुझ्या
अंग मोहरते माझे,

कधी कानी कुजबुज
कधी स्वैर गप्पा
शब्दांनी तुझ्या
मन बहरते माझे,

हलकेच हसून रोखून बघणे
कधी रुसून नजर फिरवणे
डोळ्यात तुझ्या
हृदय हरवते माझे,

कालचे दु:ख नाही
उद्याची चिंता नाही
तुझ्या सुगंधी सहवासाने
आयुष्य दरवळते माझे..

Tuesday 26 April 2016

रात्र झाली तरीही..

रात्र झाली तरीही
डोळे मिटून जागा राहतो

तुला घेऊन येणाऱ्या
स्वप्नांची वाट पाहतो..

तुलाही मी दिसतो का..?

डोळे मिटले की तू दिसतेस
डोळे उघडले की हे जग

तुलाही मी दिसतो का
जरा डोळे मिटून बघ..

Sunday 24 April 2016

मला तुझं असणं..

मला तुझं हसणं हवं आहे
मला तुझं रुसणं हवं आहे

तू जवळ नसतानाही
मला तुझं असणं हवं आहे.

हळुवार जपून ठेवलेले क्षण..

हळुवार जपून ठेवलेले क्षण
तेच माझ्या जगण्याची आस आहे

एकेक साठवून ठेवलेली आठवण
तीच माझ्यासाठी खास आहे.